Ambegaon News । आंबेगाव : प्रत्येक नात्यापेक्षा आईचे आपल्या मुलांसोबतचे नाते खूप वेगळे असते. ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ अशी म्हण देखील प्रचलित आहे. आई आपल्या लेकरासाठी जीव ओवाळून टाकते. समोर कितीही संकट आले तरी त्याला ती न जुमानता एकटी लढते. याचा प्रत्यय सध्या आला आहे. या आपल्या सात महिन्याच्या बाळासाठी एक आई थेट बिबट्याशी लढली आहे.
सदर घटना आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील फुटाणे मळ्यातील आहे. सध्या या महिलेची तिने केलेल्या धाडसामुळे खूप कौतुक केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फुटाणेमळ्यातील सुखदेव फुटाणे यांच्या शेतामध्ये धोंडीबा करगळ यांनी पत्नी सोनल आणि सात महिन्याच्या मुलासह आपल्या मेंढ्या बसवल्या होत्या. परंतु काल पहाटे दोनच्या दरम्यान, त्यांच्यावर खूप मोठे संकट आले.
Pune Crime । धक्कादायक बातमी! पुण्यात कोयता गॅंगनंतर स्प्रे गँगने घातलाय धुमाकूळ; नेमकं प्रकरण काय?
याला कारण आहे तो म्हणजे बिबट्या. अनेकांना बिबट्याचे नाव जर काढले तरी घाम येतो. त्यांच्या पालावर अचानक बिबट्या आला. सोनल यांच्या शेजारीच त्यांचा मुलगा देवा झोपला होता. बिबट्याने या चिमुकल्याचा अंथरूणाच्या बाहेर पडलेला हात तोंडात धरून त्याला ओढायला सुरुवात केली. आवाजाने सोनल यांना जाग आली, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी बिबट्याशी दोन हात केले. त्या आवाजाने सर्वजण जागे झाले. त्यामुळे त्या ठिकाणी खूप मोठा गोंधळ सुरु झाला. अखेर बिबट्याने तेथून पळ काढला.