Ajit Pawar । “बारामती अडचणीत आणाल तर परिणाम कल्याणमध्ये होईल”, अजित पवार गटाचा शिंदे गटाला थेट इशारा

Ajit Pawar

Ajit Pawar । महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) जागा वाटपाच्या मुद्द्यावर चर्चा सुरु आहे. लवकरच जागा वाटपाचा तिढा सुटेल. पण यंदाची निवडणूक अटीतटीची असणार आहे. दोनच दिवसांपूर्वी शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना धडा शिकवण्याची भाषा केली होती. अशातच आता अजित पवार गटाने शिंदे गटाला इशारा दिला आहे. (Latest martahi news)

IPL 2024 । आयपीएलमध्ये 16 वर्षांत पहिल्यांदाच असं काही घडलं की….

“जर कोणी आमच्या स्वाभिमानावर हल्ले करत असतील आणि कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणे सोपे आहे. तर कल्याण लोकसभेत वेगळा निकाल लागेल. बारामती अडचणीत आणाल तर परिणाम कल्याणमध्ये होईल”, असा दमच अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरला आहे.

Vasant More । मनसेची साथ सोडताना माध्यमांसमोर ढसाढसा रडले वसंत मोरे; नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे (Anand Paranjape) म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना विनंती आहे. त्यांनी शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांच्यासारख्या नेत्यांना आवर घालावा. नाहीतर आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणे खूप सोपे आहे. तर कल्याण लोकसभेत वेगळा निर्णय लागेल, हे लक्षात ठेवा.”

Vasant More । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! राज ठाकरे यांना मोठा धक्का; वसंत मोरे यांनी मनसेला ठोकला रामराम

Spread the love