
Vasant More । राज्याच्या राजकारणात मागच्या अनेक दिवसांपासून अनेक मोठमोठ्या घडामोडी घडल्या आहेत. सध्या देखील राज्याच्या राजकारणातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीआधीच राज ठाकरे (Raj Thackeray) यांना मोठा धक्का बसला आहे. वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मनसे नेते वसंत मोरे यांनी मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा.. असं म्हणत मनसेला रामराम करत वसंत मोरे यांनी ट्विट केले आहे. आज सकाळीच वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली होती आणि त्यानंतर लगेचच त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा … pic.twitter.com/25IQRaLfXQ
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) March 12, 2024