
Ajit Pawar । निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या देखील बारामतीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अजित पवार यांनी घेतलेला निर्णय आपल्याला पटत नसल्याचे श्रीनिवास पवार म्हणाले आहेत. काटेवाडी या ठिकाणी तेथील ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. सध्या त्यांच्या वक्तव्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे.
Balaji Kalyankar | धक्कादायक बातमी! शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला
पाहा काय म्हणाले श्रीनिवास पवार?
मी चांगल्या आणि वाईट दोन्ही काळात अजित पवारांसोबत राहिलो आहे. त्यांनी जे काही निर्णय घेतले त्याला मी साथ दिली. मी त्यांना कधीही विचारलं नाही असं का केलं म्हणून. मात्र मोठ्या साहेबांचे देखील अनंत उपकार आहेत. त्यांच्यामुळे सर्व पदं मिळाली आहेत. साहेबांचं वय आता 83 वर्ष झालं आहे, अशा स्थितीमध्ये त्यांना एकटं सोडणं मला पटत नाही. असं श्रीनिवास पाटील म्हणाले आहेत.
Indapur Firing । इंदापूर गोळीबार प्रकरणात मोठं ट्विस्ट; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले, “तुम्ही घरी बसा, किर्तन करा अशी टीका त्यांच्यावर करण अत्यंत दुर्दैवी आहे. आई -वडिलांनी जर आपल्या नावावर जमीन करून दिली तर आपण त्यांना सोडतो का? असा मोठा सवाल देखील यावेळी श्रीनिवास पवार यांनी उपस्थित केला आहे.