Ajit Pawar । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. मागच्या काही दिवसापासून अजित पवार शरद पवारांबाबत अनेक वक्तव्य करत आहेत. सध्या देखील अजित पवार यांनी शरद पवारांबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. “मी एक वेगळा रस्ता स्वीकारला आहे. मी एकेकाळी शरद पवार यांना दैवत म्हणून मानत होतो”, असं अजित पवार म्हणाले आहेत. सध्या त्यांच्या वक्तव्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे.
Salman Khan । सर्वात मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची लॉकअपमध्ये आत्महत्या
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
“ते एक वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा अधिकार आहे ना? आज मी एक वेगळा रस्ता स्वीकारलाय. एकेकाळी मी त्यांना दैवत मानत होतो. वडीलधारी असल्याने त्यांच्या स्टेटमेंटबद्दल मी काय बोलावं? याबद्दल मी अजून मोठा नाही”, असं अजित पवार म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यांनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
त्याचबरोबर अजित पवार यांच्या या वक्तव्यावर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. आव्हाड म्हणाले, “शरद पवार हा माझा बाप आहे. मी त्यांवा देव कधीच म्हटलेलं नाही. कुणालाही देवत्व देऊ नको. नुसती नाती नावापुरता असतात”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.
Crime News । ‘दाढीवाले काका आणि…’, ८ वर्षीय मुलीसोबत हॉस्टेलमध्ये घडलं भयानक; घटना वाचून बसले धक्का