Ajit Pawar । अजित पवारांची पत्रकार परिषदेत तुफान बॅटिंग, केले मोठे वक्तव्य

Ajit Pawar

Ajit Pawar । महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या दाव्यानंतर महायुतीने एक पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये अजित पवार यांच्या हजरजबाबीपणाने उपस्थितांची लक्ष वेधून घेतली. यावेळी अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात राहण्याबाबत असलेल्या अनिश्चिततेवर मिश्किल टिप्पणी केली. पत्रकारांनी शिंदे यांना प्रश्न विचारल्यावर पवार यांनी उत्तर दिले, “शिंदेंचे संध्याकाळपर्यंत कळेल, पण मी शपथ घेणार हे निश्चित आहे. मी थांबणार नाही,” असे म्हणत एका विनोदी अंदाजात वातावरण हलके केले.

Ajit Pawar । अजित पवारांकडून ‘या’ नेत्याला बक्षीस मिळणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी संध्याकाळी 5 वाजता आमंत्रित केले आहे. शपथविधीच्या दिवशी किती मंत्री शपथ घेतील, याबाबत संध्याकाळी अधिक माहिती दिली जाईल. यावर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले की, संध्याकाळी निर्णय घेण्यात येईल.

Eknath Shinde । अखेर एकनाथ शिंदेंची नाराजी दूर? शिंदे अॅक्टिव्ह मोडवर

फडणवीस यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळात राहण्यासाठी विनंती केली आहे आणि त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी त्यांना आशा आहे. याचदरम्यान, शिंदे खासदारांशी मंत्रीमंडळाच्या सहभागावर चर्चा करणार आहेत, ज्यामुळे सध्याच्या स्थितीत सर्व बाबी ठरविल्या जातील.

Cricketer Dies l ब्रेकिंग! क्रिकेट विश्वावर मोठी शोककळा, क्रिकेटपटूचा मैदानातच मृत्यू

Spread the love