Ajit Pawar | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला रामराम ठोकत भाजप सोबत युती केली आहे. त्यावरून अजूनही राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे फडणवीस सरकार असा संघर्ष पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजप सोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अशातच आता शिंदे सरकारमधील एका बड्या नेत्याने अजित दादांना सरकारमध्ये येण्यासाठी ऑफर दिली आहे. अजित दादांना ऑफर देणारा तो मंत्री कोण? असा सवाल पडत आहे.
Mira Road Murder | मृत्यूनंतर तिचे न्यूड फोटो काढले अन्…, आरोपी मनोजचा खुलासा वाचून बसेल धक्का
“अजितदादा हे जबाबदार नेते आहेत. त्यांनी बेजबाबदार विधाने करू नये. संजय राऊतांसारखे लोक दररोज बोलत असतात, परंतु त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. अजितदादांची वक्तव्य जनता गांभीर्याने घेत असते. त्यांच्या बद्दल मला आदर असल्याचे विधान शिंदे गटाचे नेते आणि राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.”
Mira Road Murder | मृत्यूनंतर तिचे न्यूड फोटो काढले अन्…, आरोपी मनोजचा खुलासा वाचून बसेल धक्का
पुढे ते म्हणाले की, “सामाजिक ऐक्य राखण्यामध्ये दादा आमच्या सोबत असतील अशी मला खात्री आहे. दादांनी पण सरकारमध्ये यावे ही आमची अपेक्षा आहे.” केसरकर यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान या सर्व प्रकरणावर अजित पवार काय उत्तर देतील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
BJP । भाजपला पुन्हा गळती! ४०० वाहनांच्या ताफ्यासह भाजपच्या बड्या नेत्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश
तसेच त्यांनी जाहिरातीच्या मुद्द्यावरून भाष्य केले. जाहिरातीचे पैसे चेकने दिले. ते स्वत: देवू शकतात. किती दिवस तुम्ही अशी घाणेरडी भाषा वापरत राहणार? पुढे त्यांनी मुख्यमंत्र्यांना बेडूक म्हणणाऱ्या भाजप खासदार अनिल बोंडे यांचीही त्यांनी खरमरीत शब्दात टीका केली आहे. “स्वतःच्या मुख्यमंत्र्यांना बेडूकपणे हा संपूर्ण राज्याचा अपमान आहे,” अशा शब्दात त्यांनी बोंडे यांचा समाचार घेतला आहे.
Cyclone Biparjoy: भयानक! बिपरजॉय वादळाची धडकी भरवणारी दृश्य आली समोर, पाहा व्हिडिओ