संपूर्ण राज्याला हादरून सोडणाऱ्या सरस्वती वैद्य (Saraswati Vaidya) हत्या प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणात दिवसेंदिवस नवीन खुलासे समोर येत आहेत. मनोज सानेने (Manoj Sane) सरस्वतीच्या शरीराचे तुकडे केले. शरीराच्या तुकड्यांचे दुर्गंधी येऊ नये. तसेच मृतदेहाची सहज विल्हेवाट लावता यावी. यासाठी त्याने स्वयंपाक घरात काही तुकडे तळले. काही तुकडे पाण्यात उकळले, असे अनेक नवीन खुलासे तपासातून पुढे येत आहेत. (Mira Road Murder )
BJP । भाजपला पुन्हा गळती! ४०० वाहनांच्या ताफ्यासह भाजपच्या बड्या नेत्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश
या प्रकरणाबाबत दररोज आरोपी नवनवीन खुलासे करत आहेत. सध्या देखील आरोपी मनोजने एक मोठा खुलासा केला आहे. मारकेरी मनोज सानेने दिलेल्या माहितीमुळे पोलिस देखील चक्रावले आहेत. आरोपी मनोजने सरस्वतीची केवळ हत्याच केली नाही तर सरस्वतीची हत्या केल्यानंतर त्याने तिचा न्यूड फोटो काढल्याचे देखील कबूल केले आहे.
Cyclone Biparjoy: भयानक! बिपरजॉय वादळाची धडकी भरवणारी दृश्य आली समोर, पाहा व्हिडिओ
दरम्यान, सरस्वतीच्या मृतदेहाचे ३५ अवयव सापडले आहेत, मात्र अनेक भागांचा अजूनही शोध सुरूच आहे. या प्रकरणाबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यामुळे सरस्वतीची हत्या मनोज सानेनेच केली होती हे सिद्ध करणे, हे पोलिसांसमोरचे आव्हान आहे
सर्वात मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्यांच्या घराला जमावानं लावली आग