
Ahmdnagar Lok Sabha । आज अहमदनगर लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडत आहे, मात्र त्याआधीच मध्यरात्री अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पारनेरचे भाजप तालुका अध्यक्ष राहुल शिंदे आणि निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे त्या ठिकाणी एकच खळबळ उडाली आहे. या दोन गटांमध्ये पैशावरून वाद झाल्याची माहिती मिळत आहे.
मध्यरात्री भर रस्त्यात दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भिडल्याची घटना घडली त्याचबरोबर पैशाने भरलेली बॅग देखील रस्त्यावर पडल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. संबंधित पैसे मतदारांना वाटण्यासाठी आणले असल्याचा आरोप निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे तर मग काही महिलांनी आपल्या गाडीवर हल्ला केल्याचा आरोप राहुल शिंदे यांनी केलाय.
Devendra Fadnavis । ब्रेकिंग! देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंबाबतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पैशाने भरलेली एक बॅग रस्त्यावर पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता रस्त्यावर पडलेले ती पैशांची बॅग नेमकी कोणाची? असा प्रश्न निर्माण होत आहे. पारनेर तालुक्यातील वडझिरे या ठिकाणी ही घटना घडली आहे. याप्रकरणी भाजपा तालुकाअध्यक्ष राहुल शिंदे आणि विजय औटी यांच्यावर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.