Lumpy Skin Disease । कोल्हापूरनंतर अहमदनगरमध्ये लम्पी आजाराने घातले थैमान; पशुपालक चिंतेत

After Kolhapur, Lumpy disease struck Ahmednagar; Ranchers worried

Lumpy Skin Disease । अहमदनगर : राज्यावर पुन्हा एकदा दुधाचे संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण राज्यात पुन्हा एकदा लम्पी आजाराने (Lumpy Disease) डोके वर काढले आहे. आधीच दुधाला मिळणारा कमी बाजारभाव (Milk Price) त्यात हा आजार, त्यामुळे पशुपालकांवर दुहेरी संकट आलेले आहे. समजा हा आजार (Lumpy) लवकरात लवकर आटोक्यात आला नाही तर देशावर पुन्हा एकदा दुधाचे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Latest Marathi News)

निसर्गाचा प्रकोप! भुस्खलन, मंदिर कोसळून 21 भाविकांचा मृत्यू

मागील काही महिन्यांपासून अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील एकूण 239 गावात 1 हजार 174 जनावरांना लम्पी या भयानक आजाराची लागण झालली आहे. धक्कदायक बाब म्हणजे त्यापैकी 19 जनावरे गंभीर अवस्थेत आहेत, तर आतापर्यंत 53 जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील राहुरी, पाथर्डी, शेवगाव आणि कोपरगाव तालुक्यामध्ये लम्पीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

Varas Nond Online । आनंदाची बातमी! आता फोनवरच करता येणार वारस नोंदणी, कसं ते जाणून घ्या

या आजारामुळे पशुपालकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पशुपालकांनी जनावरांचे गोठे स्वच्छ ठेवून कीटकनाशकांची फवारणी करावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. त्याशिवाय जिल्ह्यात प्रतिबंधक उपाययोजना म्हणून लसीकरणाची मोहीम सुरु केली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी दिली आहे.

Sharad Pawar । सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या फुटीबाबत शरद पवार यांनी केला मोठा गौप्यस्फोट

दुग्ध व्यवसायाला लागलेले ग्रहण कमी होत नाही. त्यात पशुपालकांवर चाराटंचाई, पशुखाद्याचे वाढलेले दर, दुधाला मिळणाऱ्या कमी दरामुळे राज्यातील पशुपालक हतबल झाला आहे. अशातच आता लम्पी आजाराची भर पडली आहे. उन्हाळ्यात हा आजार कमी झाला होता परंतु आता पुन्हा या थैमान घालायला सुरुवात केली आहे.

Share Market । गुंतवणूकदारांनो, करायची असेल चांगली कमाई तर ठेवा ‘या’ शेअर्सवर लक्ष

Spread the love