Aditya Thackeray । राजकारणातून मोठी बातमी! आदित्य ठाकरेंनी केला सर्वात मोठा गौप्यस्फोट

Adity Thackeray

Aditya Thackeray । लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर प्रचाराचा जोर जोरात सुरू आहे. अनेक नेते प्रचार करताना दिसत आहे. तर काही ठिकाणी उमेदवारांच्या नावांची घोषणा सुरु आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, प्रचारादरम्यान शिवसेना (UBT) नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

Supriya Sule । “अबकी बार गोळीबार सरकार”, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

मुंबईतील वायव्य लोकसभा मतदारसंघ गोरेगाव येथे त्यांचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या सभेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “कोण मांस खात आहे, कोण कोंबडी खात आहे, असा प्रचार विरोधी पक्ष आज करत आहे. मात्र हे लोक बेरोजगारी आणि महागाईवर बोलत नाहीत. असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

Salman Khan । सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणारा कोण? धक्कादायक माहिती समोर

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, दक्षिण भारतात भाजपसाठी दरवाजे बंद झाले आहेत. मी महाराष्ट्रात फिरतोय, जनता भाजपवर नाराज आहे. दिल्लीत आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. केजरीवाल यांच्या अटकेमुळे लोक संतप्त झाले आहेत. दिल्लीत भाजप एकही जागा जिंकणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

Manoj Jarange Patil । “…त्यांनी मराठा समाजाचा विश्वासघात केला”, मनोज जरांगे पाटलांचं धक्कादायक वक्तव्य

Spread the love