तुमच्या गावात कोणी जमीन खरेदी केली आणि कोणी विकली? एका मिनिटात समजणार, जाणून घ्या कसं ते?

Who bought and sold land in your village? Understand in a minute, know how?

अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात जमिनीची खरेदी विक्री (Land purchase and sale) होऊ लागली आहे. काही जण या जमिनीवर घर बांधत आहेत तर काही जण शेतीसाठी जमीन वापरत आहेत. बऱ्याचदा आपल्याला ती जमीन कोणाच्या मालकीची आहे ते माहिती नसते. अनेकांची जमीन खरेदी करत असताना फसवणूक (Land Fraud) होते. परंतु आता इथून पुढे तुमची जमीन खरेदी करताना फसवणूक होणार नाही. संबंधित जमिनीची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच समजेल. (Latest Marathi News)

Bus Accident । भाविकांवर काळाचा घाला! 50 फूट खोल दरीत बस कोसळून 7 भाविकांचा जागीच मृत्यू

आपली चावडी पोर्टल

जर तुम्हाला तुमच्या गावातील सर्व जमिनींचे व्यवहार पाहायचे असतील तर तुम्ही आता आपली चावडी पोर्टलची मदत घेऊ शकता. या पोर्टलची खासियत म्हणजे सातबारा उताऱ्यावर या व्यवहाराची नोंद होण्यापूर्वी तुम्हाला या पोर्टलवर खरेदी विक्रीची माहिती समजेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला या पोर्टलवर माहिती प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पंधरा दिवसाच्या आत आक्षेप घेता येतो.

महायुतीला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याने केली स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या घोषणा

अशाप्रकारे पहा व्यवहार

  • यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला आपली चावडी पोर्टल https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawadi ही वेबसाईट ओपन करावी लागणार आहे.
  • त्यानंतर तुम्हाला सातबाराविषयी, मोजणी विषयी आणि मालमत्ता पत्रक विषयी पर्याय दिसतील.
  • त्यातील सातबारा विषयी हा पर्याय निवडा.
  • सर्वात शेवटी तुम्ही राहत असणाऱ्या जिल्हा, तालुका आणि तुमचे गावाची निवड करा. आता तुम्हाला एक कोड येईल व्यवस्थित टाकून आपली चावडी पहा वर क्लिक करा. तुम्हाला जमिनीच्या संदर्भातील चालू व्यवहार आणि चालू फेरफार यांची माहिती मिळेल.

Animal Husbandry Business : ‘ही’ गाई देते 800 लिटर दूध, जाणून घ्या नेमकी काय आहे खासियत?

तुम्हाला आता या पोर्टलच्या माध्यमातून तुमच्या गावातील जमीन खरेदी विक्रीची माहिती एका मिनिटात समजेल. त्यामुळे तुमची कोणतीही फसवणूक होणार नाही. या व्यवहारांवर तुम्हाला आक्षेपही घेता येईल. तसेच तुम्हाला जमिनीसंदर्भात सतत अपडेट मिळत राहतील.

Onion Subsidy । कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अखेर मंजूर झाले अनुदान, पहा जिल्ह्यानुसार अनुदान यादी

Spread the love