Sharad Pawar News । रोहित पवारांच्या कंपनीवर कारवाई, शरद पवारांनी सोडले मौन, म्हणाले…

Action taken against Rohit Pawar's company, Sharad Pawar broke his silence, said...

Sharad Pawar News । बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती ॲग्रो (Baramati Agro) कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Maharashtra Pollution Control Board) नोटीस पाठवली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या नोटीस पाठवत कंपनीला दोन प्लांट बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest martahi news)

Fish Farming । नादच खुळा! वयाच्या ५८ व्या वर्षी महिला मत्स्यपालनातून कमावते लाखो रुपये; जाणून घ्या कसं केलं जात नियोजन?

आज शरद पवार बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या गोविंद बाग या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवरील कारवाईबाबत प्रश्न विचारला असता, त्यावर त्यांनी ‘मी प्रकरणावर उत्तर देणार नाही’, असे म्हणत त्यांनी या विषयावर बोलणं टाळलं. तसेच त्यांनी ओबीसी (OBC) आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं.

Vishal Bribe Case । “माझे पैसे वाया गेले”, प्रसिद्ध अभिनेत्याने केली एकनाथ शिंदेंकडे तक्रार

आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना पवार म्हणाले की, “आरक्षण देत असताना ज्यांना आरक्षण मिळतं त्यांच्यातील वाटा दुसऱ्यांनी घेऊ नये, अशी अपेक्षा ओबीसींची आहे. याची नोंद राज्य सरकारला घ्यावी लागणार आहे. दरम्यान, याबाबत राज्य सरकार काय निर्णय घेईल, हे तुम्हाला 30-35 दिवसांत समजेल”, असे शरद पवार म्हणाले आहे.

Health Tips । 15 दिवस खाऊ नका भात, तुम्हाला जाणवतील आश्चर्यकारक बदल

Spread the love