Accident News । भीषण अपघात! भरधाव कारने १० ते १२ जणांना चिरडलं; पाहा धक्कादायक व्हिडीओ

Accident News

Accident News । सध्या एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी रात्री एका अनियंत्रित कारने एकामागून एक 10 जणांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. धडकेनंतर चालकाने कारसह घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे जमाव संतप्त झाला. संतप्त जमावाने आरोपीला जागीच पकडून बेदम मारहाण केली. ही घटना पूर्व दिल्लीतील गाझीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील मयूर विहार फेज-3 येथील मार्केटमध्ये घडली आहे.

Ads

Lok Sabha Election । अशोक चव्हाणांचा काँग्रेसला मोठा धक्का! ‘या’ नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश

घटनास्थळी उपस्थित लोकांनी जखमींना खासगी वाहनातून एलबीएस रुग्णालयात नेले, तेथे एका महिलेला मृत घोषित करण्यात आले. सीता देवी (22, रा. खोडा कॉलनी, गाझियाबाद) असे मृत महिलेचे नाव आहे. सीतादेवी खोडा कॉलनीत आपल्या कुटुंबासह राहत होत्या. त्या बाजारात खरेदीसाठी आल्या होत्या.

Vasant More । सर्वात मोठी बातमी! वसंत मोरे करणार भाजपमध्ये प्रवेश? ‘त्या’ फोनवरून रंगली चर्चा

दोघांची प्रकृती चिंताजनक

या घटनेची माहिती मिळताच अनेक पोलीस ठाण्यांच्या पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयात दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. वृत्त लिहेपर्यंत घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिस त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. या घटनेचा व्हिडिओ रात्री उशिरा सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Cabinet meeting । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! सरकारने अहमदनगर शहराचं नाव बदललं, हे असणार नवीन नाव

Spread the love