Sharad Mohol Video । शरद मोहळच्या हत्येचे थरकाप उडवणारे सीसीटीव्ही फुटेज समोर

Sharad Mohol Video

Sharad Mohol Video । पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळची त्याच्याच टोळीतील काही सदस्यांनी शुक्रवारी दुपारी गोळ्या झाडून हत्या केली. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. आता एक सीसीटीव्हीही समोर आले आहे, व्हिडीओमध्ये शरद मोहोळ (Sharad Mohol) वाटेने जात असताना काही लोक पिस्तुल घेऊन तिथे पोहोचतात आणि मोहोळवर गोळ्या झाडायला सुरुवात करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Pune MNS News । राज ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश

गोळीचा आवाज ऐकून तेथे उपस्थित काही लोक गोळीबार करणाऱ्यांना पकडण्यासाठी धावले पण आरोपी तेथून फरार झाले. सावलीप्रमाणे त्याचा पाठलाग करणाऱ्या शरद मोहोळच्या साथीदारांनी त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केल्याचे स्पष्ट झाले असून त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. तेव्हा तेथे उपस्थित काही लोकांनी शरद मोहोळ याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि मदतीसाठी आरडाओरडा केला. (Pune Crime News)

Sharad Mohol | ब्रेकिंग! शरद मोहोळच्या हत्येमागील खरा मास्टर माईंड समोर; पोलिसांनी दिली माहिती

तीन ते चार हल्लेखोरांनी हत्या केली

अधिकाऱ्याने सांगितले, “तीन ते चार हल्लेखोरांनी मोहोळ यांच्यावर कोथरूडमधील सुतारदरा येथे दुपारी 1.30 वाजता जवळून गोळ्या झाडल्या. एक गोळी त्याच्या छातीत तर दोन गोळ्या उजव्या खांद्याला लागल्याचे त्यांनी सांगितले. कोथरूड परिसरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान 40 वर्षीय मोहोळचा मृत्यू झाला.

Sharad Mohol Murder । शरद मोहोळ हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, दोन वकिलांनी…

कोण होता शरद मोहळ? (Who was Sharad Mohal?)

शरद मोहोळ हा मुळशी तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबातील होता. त्याचे आई-वडील शेतकरी असून त्याची घरची परिस्थिती देखील हालाखीची होती. शरदने गुन्हेगारी क्षेत्रात सुरुवातीला कुख्यात गुंड संदीप मोहोळ याचा ड्रायव्हर म्हणून काम केले. मात्र संदीप मोहोळची ज्यावेळी हत्या झाली त्यानंतर तो गुन्हेगार म्हणून नावारूपास आला. शरद मोहोळ यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

Dhangar Reservation । धक्कादायक! धनगर आरक्षणासाठी युवकाचा टोकाचा निर्णय, संपवलं जीवन

Spread the love