Sharad Pawar । ब्रेकिंग! शरद पवारांना सर्वात मोठा धक्का; निष्ठावंत नेता भाजपच्या गळाला

Sharad Pawar

Sharad Pawar । मागच्या काही दिवसापासून माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha Constituency) मोठ्या घडामोडी घडत आहेत. हा मतदारसंघ सतत चर्चेत आहे. सध्या देखील या मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पंढरपूरचे राष्ट्रवादीचे नेते अभिजीत पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे माढ्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. (Politics News)

Ajit Pawar । शरद पवारांबाबत अजित पवारांचं सर्वात मोठं वक्तव्य; म्हणाले, “एकेकाळी मी त्यांना दैवत…”

अभिजित पाटील हे शरद पवार गटाचे नेते असून त्यांनी १ मेच्या रात्री भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून शरद पवार यांना देखील मोठा धक्का बसला आहे. शरद पवार यांचा पंढरपुरातील (Pandharpur) निष्ठावंत मोहरा भाजपच्या गळाला लागला आहे. यामुळे या ठिकाणी भाजपची ताकत वाढली आहे.

Salman Khan । सर्वात मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची लॉकअपमध्ये आत्महत्या

मागच्या काही दिवसांपासून अभिजित पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यापासून अभिजित पाटील भाजपमध्ये प्रवेश (Abhijit Patil Supports BJP) करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र आता त्यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम देत भाजपला पाठिंबा दिला आहे.

Shiv Sena Nashik Candidates । ब्रेकिंग! नाशिकच्या जागेचा तिढा अखेर सुटला, शिंदे गटाने या नेत्याला दिली उमेदवारी

Spread the love