खाकीबाबा ते महांडुळवाडी रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे संबंधितांवर कारवाईसाठी संभाजी ब्रिगेडचे सार्वजनिक बांधकाम विभाग याना निवेदन!

Shrigonda News

खाकीबाबा(श्रीगोंदा) ते महांडुळवाडी(मांडवगण) या तालुक्याच्या मुख्य रस्त्याचे काम अनेक महिने झाले रखडलेले आहे.या रस्त्यासाठी निधी उपलब्ध असताना रस्त्याचे काम करणारे कॉन्ट्रॅक्टर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या समन्वयाच्या अभावी आणि कामाच्या निकृष्ट दर्जाच्या अभावी हे काम रखडलेले आहे.तालुक्याला जोडणारा हा मुख्य रस्ता असल्याने यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे तरी रस्त्याच्या अर्धवट कामामुळे त्याठिकाणी असिडेंट होण्याचे प्रमाण वाढले आहे.

Viral Video । महिला रस्त्याच्या मधोमध करत होती योगा, वाहने थांबली त्यानंतर घडलं असं की..,व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

संभाजी ब्रिगेडच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग, अहमदनगर आणि रस्त्याचे काम घेतलेले कॉन्ट्रॅक्टदार याना वेळोवेळी सांगून आणि पाठपुरावा करून देखील अद्याप रस्त्याचे काम सुरू झालेले नाही.रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे नागरिकांचे होणारे हाल आणि अपघात याला जवाबदार असणाऱ्या दोषी वर चौकशी करून संबंधित ठेकेदाराचे लायसन्स रद्द करून यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि संबंधीत रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावे अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने ठिय्या आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष (शेतकरी आघाडी) संग्राम देशमुख यांनी दिला आहे.

Election । मोठी बातमी! पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर; मतदान कधी होणार? जाणून घ्या

        संग्राम देशमुख
   (प्रदेश उपाध्यक्ष संभाजी   
    ब्रिगेड,शेतकरी आघाडी)
Spread the love