Petrol and diesel rate । ब्रेकिंग! पेट्रोल आणि डिझेल कधी स्वस्त होणार? खुद्द पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली मोठी माहिती

Petrol Diesel Rate

Petrol and diesel rate । सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर हे गगनाला भिडले आहेत. यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागतो. पेट्रोल डिझेलचे दर कधी कमी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यामध्येच आता पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर मोठे वक्तव्य केले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करू शकते, असे सांगण्यात येत असलेल्या बातम्यांवर त्यांनी आपले वक्तव्य केले आहे. (Petrol and diesel new rate)

Sayaji Shinde | मराठा आरक्षणाबद्दल सयाजी शिंदे यांचं सर्वात मोठं वक्तव्य

कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याचा अंदाज अनेक दिवसांपासून वर्तवला जात आहे. डिसेंबर महिन्यात कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल 80 डॉलरच्या खाली राहून 75 ते 77 डॉलर प्रति बॅरल दरम्यान राहिली. त्यामुळे देशातील तेल कंपन्यांना मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या कमी दराचा फायदा सर्वसामान्यांनाही मिळावा, अशी सरकारची इच्छा आहे.

Pune Crime । पुणे हादरलं! जन्मदात्या बापाने मुलीवर कुऱ्हाडीने केले वार

पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की, सरकारी तेल कंपन्या इंधनाच्या किमती कमी करण्याबाबत केंद्राशी चर्चा करत नाहीत. ते म्हणाले की, सर्व मीडिया रिपोर्ट्स केवळ अनुमानांवर आधारित आहेत. त्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. अशा कोणत्याही मुद्द्यावर सरकारच्या तेल कंपन्यांशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्ट केले.

Bacchu Kadu । ब्रेकिंग! बच्चू कडू यांना सर्वात मोठा धक्का

सध्या प्रचंड अशांततेचे वातावरण आहे, जागतिक नकाशावर दोन भागात संघर्ष सुरू आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती अस्थिर आहेत. 2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी सोशल मीडियावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, पुरी म्हणाले की, इंधनाच्या दरात कपातीचे हे वृत्त दिशाभूल करणारे आहेत.

Manoj Jarange । मनोज जरांगे यांच्या घरात कुणबी नोंदी नाहीत; धक्कादायक माहिती समोर

Spread the love