
अपघाताच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत सतत कुठे ना कुठे अपघाताच्या घटना घडतच आहेत. सध्या देखील अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेक्सिकोची (Mexico) राजधानी मेक्सिको सिटीजवळ एक भीषण अपघात झाला झाल्याची माहिती समोर आली आहे. योसोंडुआकडे जाणारी एक बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. (Accident News)
शेतकऱ्यांनो करा ‘या’ तांदळाची शेती, किलोला मिळेल 500 रुपये भाव
हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये २७ जणांचा मृत्यू झाला आहे तर २१ जण गंभीर जखमी झाले. यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत पावलेल्या लोकांमध्ये एका लहान बाळाचा देखील समावेश होता, आज (गुरुवार) सकाळी ६.३० च्या दरम्यान हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे. (Latest Marathi News)
अपघात एवढा भीषण होता की, बस थेट २५ मीटर खोल दरीमध्ये कोसळली. या अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. माहितीनुसार, या अपघातामध्ये २५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर, २१ जण गंभीर जखमी झाले. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.