Gudipadwa । गुढीपाडव्याला गालबोट! एकाला वाचवायला गेले अन् 4 कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू

Gudipadwa

Gudipadwa । विरार : संपूर्ण राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह सुरू आहे. पण गुढीपाडव्याला गालबोट लागले आहे. विरारमध्ये एक दुर्दैवी घटना घडली असून विरार पश्चिमेकडील रुस्तुम जी शाळेच्या बाजूला सेफ्टी टँकची सफाई चालू असताना 4 कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू (Laborers died) झाला आहे. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. (Latest marathi news)

Chandrakant Patil । भाजप कसं गाठणार 400 चा आकडा? चंद्रकांत पाटलांनी सांगितलं समीकरण

याबाबत अधिक माहिती अशी की, विरार पश्चिम येथील S.T.P. प्लांटमधील चोकअप झाला होता. त्यामुळे दुरस्तीसाठी कर्मचारी तिथे गेला होता. पण बराच वेळ झाला तरी तो परत आला नाही. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी दुसरा देखील कर्मचारी गेला. पण तो परत न आल्याने तिसरा देखील कर्मचारी गेला. तिसराही परत न आल्याने चौथा त्यांना शोधण्यासाठी गेला. अशाप्रकारे एका पाठोपाठ चार एसटीपी प्लांटमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. (Laborers died in Virar)

Eknath Khadse । भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु असतानाच एकनाथ खडसे यांना बसला सर्वात मोठा धक्का

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ब्रीदिंग ऑपरेटर सेट परिधान करून कर्मचाऱ्यांनी पाण्यात बुडीत मृत व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना बाहेर काढले. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले असून कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचे कारण अजूनही समोर आले नाही.

Lok Sabha Elections 2024 । काँग्रेस नेत्याचे धक्कादायक वक्तव्य; म्हणाले, “निवडणुकीत माझ्या मुलाचा पराभव झाला पाहिजे”

Spread the love