Gautami Patil । सांभाळ केला नाही तरीही गौतमी यशाचं श्रेय वडिलांना का देते? जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण

Why does Gautami give success to her father even if he did not take care of her?

Gautami Patil । ‘सबसे कातिल गौतमी पाटील’ ही उपाधी गौतमीला तिच्याच चाहत्यांकडून मिळाली आहे. गौतमी आज प्रत्येक घरात पोहोचली आहे. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला (Gautami Patil Event) हजारोंच्या संख्येने गर्दी होत असते. परंतु तिच्या प्रत्येक कार्यक्रमात गोंधळ झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे कार्यक्रमावेळी पोलीस बंदोबस्त करावा लागतो. तरीही गोंधळ झाला तर पोलिसांना हुल्लडबाजांवर लाठीचार्ज करावा लागतो. (Latest Marathi News)

Sharad Pawar । “शरद पवार कधीही कुणाशी युती करू शकतात”; शिंदे गटाच्या नेत्याचं खळबळजनक विधान

तिने नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी तिने आपल्या यशाचं श्रेय वडिलांना (Gautami Patil Father) दिले आहे. विशेष म्हणजे तिचा सांभाळ तिच्या वडिलांनी नाही तर तिच्या आईने केला आहे. गौतमी आठवीमध्ये शिकत असताना तिने पहिल्यांदा तिच्या वडिलांना पाहिले. तोपर्यंत आपल्याला वडील आहेत हे तिला माहिती नव्हते. नुकतेच तिच्या वडिलांचे निधन झाले आहे.

Vaidyanath Sugar Factory । पंकजा मुंडेंना मोठा दणका! तब्बल 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

“मी माझ्या यशाचं सगळं श्रेय आई आणि वडिलांना देते. कारण आज जर वडील सोबत असते तर मी डान्स क्षेत्रात आले नसते. आमच्या समाजात नृत्याच्या क्षेत्रात सहजासहजी कोणाला येऊ देत नाही. माझ्या वडिलांनी मला या क्षेत्रात येऊच दिलं नसतं. मी या क्षेत्रात नसते तर आज माझं लग्न झालं असतं. मला आता एक तरी पोरगं असतं,” असे गौतमी पाटील म्हणाली आहे.

Loksabha Election 2024 । बारामती मतदारसंघातून कोणाला संधी मिळणार? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

“ज्यावेळी मी आठवीननंतर पुण्याला जायला निघाले त्यावेळी आमचा सांभाळ कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे आम्ही वडिलांना बोलावून त्यांना वॉचमनची नोकरी लावून दिली. परंतु तिथेही त्यांनी हाणामारी केली. दारूमुळे त्यांची नोकरी गेली. माझा आईने सांभाळ केला. तिच्यासाठी मी सर्वकाही केलं आहे,” असेही गौतमीने स्पष्ट केले आहे.

Ganesh Festival । काय सांगता? गणेश मूर्तीच्या डोळ्यात अश्रू, भाविकांची प्रचंड गर्दी

Spread the love