Supriya Sule । सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आपल्याला कायम जुंपलेली दिसते. लोकसभेमध्ये (Loksabha) विरोधकांकडून मणिपूरच्या हिंसाचाराच्या घटनेवरून (Manipur Violence) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) अविश्वास प्रस्ताव मांडला गेला. यावेळी अविश्वास प्रस्तावावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बोलताना देशाची आर्थिक परिस्थिती, महागाई आणि हिंसाचाराच्या घटनांवरून केंद्र सरकारवर (Central Govt) चांगलाच निशाणा साधला. (Latest Marathi News)
Share Market । गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! लवकरच शेअर बाजार गाठणार नवीन उच्चांक
बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ९ वर्षांपूर्वी “बहुत हुई मंहगाई की मार, अबकी बार”, असे म्हणत सत्तेत आलेल्या भाजप (BJP) सरकारमुळेच मोठ्या प्रमाणात महागाई झाली आहे. इथे शेतकऱ्यांच्या कांदा, तेल, डाळ, दूधाला भाव देत नाही आणि ते परदेशामधून आयात का करता? असा संतप्त सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, ” काही दिवसांपूर्वी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा पडून होता. त्यावेळी कांदा निर्यातीची (Onion export) परवानगी देण्याची मागणी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे करण्यात आलेली होती. महत्त्वाचे म्हणजे त्याचवेळी जगभरातल्या कांद्याच्या उत्पादनात घट झाली होती. तेव्हा कांद्याची निर्यात करायला हवी होती. परंतु तसे काही झाले नाही”, असे सुळे यांनी स्पष्ट केले.
Kusum Solar Yojana । आनंदाची बातमी! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज, कसं ते जाणून घ्या