‘चिकन लेग पीस’ म्हणून ओळखले जाणारे उल्हास कामठे आहेत तरी कोण? महिन्याला कमवतात ‘इतके’ रुपये; जाणून घ्या त्यांच्याबद्दल सविस्तर

Who is Ulhas Kamthe known as 'Chicken Leg Piece'? earn 'so much' rupees per month; Learn more about them

सोशल मीडिया (Social media) हा असा प्लॅटफॉर्म आहे ज्यामुळे माणूस खूप कमी वेळातच फेमस होऊ शकतो. सोशल मीडियामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब इत्यादींचा वापर केला जातो. यामध्ये सगळ्यात जास्त इंस्टाग्राम (Instagram) हे माध्यम वापरले जाते. इंस्टाग्रामवर लहान मूल, तरुण लोकं त्याचबरोबर वयोवृद्ध लोक सुद्धा व्हिडीओज बनवत असतात. सोशल मीडियावर अनेकजण असे आहेत की त्यांनी खूप कमीवेळामध्ये भरपूर प्रसिद्धी मिळवली आहे. यामधील एक नाव म्हणजे ‘चिकन लेग पीस’ अशी खास ओळख असणारे स्टार उल्हास कामठे (Ulhas Kamthe). चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती.

हनिमूनला गेलेल्या पती-पत्नीसोबत मध्यरात्री घडले भयानक! घटना वाचून बसेल धक्का

इंस्टाग्राम किंवा दुसऱ्या एखाद्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मव चिकन लेग पीस चवीने खाणाऱ्या अवलियाचा व्हिडीओ तुमच्या डोळ्यासमोर आलाच असेल. हे दुसरे कोणी नसून उल्हास कामठे आहेत. तुम्ही बऱ्याचदा त्यांना सोशल मीडियावर पाहिलंच असेल. मात्र आज आपण त्यांच्याबद्दल काही खास माहिती जाणून घेणार आहोत.

मोठी बातमी! पुण्यामध्ये बैलगाडा शर्यती दरम्यान एकाचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी

उल्हास कामठे यांना ‘चिकन लेग पीस’ या नावाने ओळखलं जातं. सोशल मीडियावर त्यांच्या व्हिडीओजला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज आणि लाईक्स मिळत असतात. ते सोशल मीडियावर सतत नवनवीन व्हिडीओ टाकत असतात. चिकन लेग पीसचा आस्वाद घेणाऱ्या उल्हास कामठे यांची खास स्टाईल ही प्रचंड लोकप्रिय झाली आहे.

शरद पवारांबद्दल बोलताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली; नको तेच बोलले अन्..

महत्वाचं म्हणजे उल्हास हे फूड ब्लॉगर आहेत. त्यांच्या खाण्याचे व्हिडीओ लोकांना पाहण्यास खूप आवडतात. त्यांचा चाहतावर्ग देखील खुप मोठा आहे. लोक त्यांच्या व्हिडिओला भरभरून प्रेम देतात. हातामध्ये विविध प्रकारच्या अंगठ्या, त्याचसोबत ब्रेसलेट, गळ्यात भरपूर चेन्स या लूकमध्ये उल्हास कामठे यांचे भरपूर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

जेथे शिवसेनेचा खासदार, ती जागा शिवसेनाच लढवणार; श्रीकांत शिंदे यांची माहिती

उल्हास कामठे हे ४३ वर्षांचे असून त्यांचा जन्म १० जुलै १९८० साली मुंबईत झाला आहे. त्याचबरोबर त्यांचे शिक्षण देखील मुंबईमध्येच झाले आहे. ते मुंबईत एक जीम देखील चालवतात. उल्हास कामठे हे पहिल्यांदा टिकटॉकवर त्यांच्या स्वतःच्या डान्सचे व्हिडीओ बनवत होते. मात्र त्या व्हिडिओंना लोकांकडून जास्त प्रतिसाद मिळत नव्हता मग त्यांनतर त्यांनी फूड चे व्हिडीओ बनवायला सुरवात केली आणि आता यामुळे त्यांना चांगली लोकप्रियता मिळाली आहे.

अजित पवारांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊत यांनी केली दिलगिरी व्यक्त; म्हणाले…

‘चिकन लेग पीस’ असं एकदम हटके स्टाईलमध्ये बोलतात त्यांच्या या स्टाईलने नेटकऱ्यांना अक्षरक्ष वेड लावले आहे. घाटकोपरमध्ये उल्हास यांनी ‘चिकन लेग पीस’ या नावाने नॉन-व्हेज लव्हर्ससाठी एक खास रेस्टोरंट देखील सुरू केलं आहे. त्याच्या कमाईबद्दल पाहिले तर ते महिन्याला लाखो रुपये कमावतात. मीडिया रिपोर्टनुसार, व्हिडीओजमधून आणि सोशल मीडिया पार्टनरशीपमधून उल्हास कामठे महिन्याला ३ ते ४ लाख कमावतात.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *