“देव अक्कल वाटत होता तेव्हा तुम्ही…“, पाकिस्तानच्या ‘या’ बड्या प्लेयरची राहुल द्रविडवर टीका

"When God thought common sense, you...", Pakistan's 'Ya' big player criticized Rahul Dravid

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला (World Test Championship) भारतीय प्लेयर्सकडून अपेक्षेपेक्षा खूपच कमी प्रतिसाद मिळाला आहे. सलग तिसऱ्या दिवशीही कांगारूचचं (Australia) वर्चस्व प्रस्थापित झालं आहे. त्यामुळे भारतीय प्लेयर्स समोर खूप मोठं आवाहन असणार आहे. या फायनलच्या मॅचमध्ये भारताने प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. नंतर या संघात आर अश्विनीला (R Ashwin) स्थान न दिल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

लग्नाला अवघे तीनच दिवस झाले, अन् बायकोने केला नवऱ्याचा खून; घटनेचे कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

याच निर्णयामुळे माजी क्रिकेटपटूंनी सवालांच टीकास्त्र सोडलं आहे. ही निवड न केल्याचे परिणाम पहिल्या एक-दोन दिवसातच दिसून आले. एका बाजूला ऑस्ट्रेलियन बॅट्समनने धुव्वाधार रन्स करत भारतीय टीम पुढे खूप मोठा डोंगर उभा केला होता. तर दुसरीकडे भारतीय बॅट्समन ऑस्ट्रेलियन बॉलर्स पुढे जास्त वेळ टिकू शकले नाहीत. त्यानंतर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि ऑलराऊंडर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी भारताची लाज राखण्याचा खूप प्रयत्न केला. खरंतर शिखराच्या अर्ध्या रस्त्यावर या तिघांनीच टीमला पोहोचवलं . परंतु ऑस्ट्रेलियाने आघाडीच मारली असंच म्हणावं लागेल. दरम्यानच पाकिस्तानचा (Pakistan) माजी क्रिकेटपटू बासीत अली (Basit Ali) याने भारतीय संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका केली आहे. राहुल द्रविड (Rahul Dravid) खूप कमकुवत कोच असल्याचं त्याने म्हंटले आहे.

पुण्यामध्ये भंगार दुकानाला लागली भीषण आग! संपूर्ण परिसरात धुराचे सावट

“राहुल द्रविडचा मी कायमच फॅन राहणार. तो क्लास प्लेयर आणि लेजंड कायमच होता आणि आहे. परंतु एक कोच म्हणून तो झिरो आहे. तुम्ही भारतात टर्निंग खेळपट्टी तयार केली तर मग ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तशा समान विकेट्स का होत्या? त्यांच्याकडे बाउन्स होईल असं पीच होतं ना? मग देवालाच माहिती की नेमका काय विचार तुम्ही करत होता. जेव्हा देव अक्कल वाटत होता तेव्हा तुम्ही डोंगरपलीकडे लपला होता”. असं बासीत अली यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हंटलं आहे.

सर्वात मोठी बातमी! अखेर शरद पवारांनी फिरवली भाकरी, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *