Nitin Desai । नितीन देसाईंचा मृत्यू कशामुळे झाला? पोस्टमार्टम अहवालातून धक्कादायक माहिती समोर

What caused the death of Nitin Desai? Shocking information comes out from the postmortem report

Nitin Desai । लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक नितीन देसाई यांनी काल त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या (Nitin Desai Death) केली आहे. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण चित्रपटसृष्टीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर 250 कोटी रुपयांचं कर्ज (Loan) असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. कर्जाची रक्कम फेडणं अशक्य असल्याने त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (Latest Marathi News)

Rain in Maharashtra । राज्यात आज पुन्हा मुसळधार पाऊस! पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

पोलिसांनी काल त्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे रुग्णालयात नेला होता. त्यांचा शवविच्छेदन अहवाल (Nitin Desai Postmortem Reports) समोर आला आहे. नितीन देसाई यांचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाल्याची प्राथामिक माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. आज त्यांच्यावर ND स्टुडिओमध्ये (ND Studio) अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Pandharpur News । ‘विठुरायाचे दर्शन घ्यायचंय? पैसे द्या…’; पंढरपुरात भाविकांना लूटणाऱ्या एजंटना पकडले रंगेहाथ

त्यांच्या काही ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती लागल्या असून याबाबतचा आधिक तपास पोलीस करत आहे. दरम्यान, त्यांनी एका कंपनीकडून त्यांनी तब्बल 180 कोटी रुपयांचं कर्ज घेतल होत. या कर्जाची रक्कम आणि व्याज मिळून ही रक्कम 250 कोटी झाली होती. आता या कर्जाचे काय होणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात आला आहे.

Koyna Dam । दिलासादायक! संततधार पावसामुळे कोयना धरणात ‘इतका’ पाणीसाठा

Spread the love