Viral Video On Social Media । डिलिव्हरी बॉयने केले संतापजनक कृत्य, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, “यावर कारवाई…”

Viral Video On Social Media. The delivery boy did an outrageous act, netizens expressed their anger after seeing the video; Said, "Action on this..."

Viral Video On Social Media | सोशल मीडियावर दररोज अनेक वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये सोशल मीडियावर डिलिव्हरी बॉय संबंधित व्हिडिओ व्हायरल होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये डिलिव्हरी बॉयच्या प्रामाणिक कष्टाचे कौतुक करणारे व्हिडिओ तर कधी त्यांचे विचित्र कृतीचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या देखील एका डिलिव्हरी बॉयचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

Pune Metro । पुणेकरांचा मेट्रोला उत्तम प्रतिसाद! एकाच दिवसात सर्वाधिक प्रवाशांनी केला मेट्रो मधून प्रवास

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, डिलिव्हरी बॉय फूड ऑर्डर पोहोचवण्यासाठी निघाला असताना ऑर्डर बॉक्स मधील अन्न खाताना दिसत आहे. प्राऊड टू बी इंडियन नावाच्या फेसबुक अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ चर्चेत असून या व्हिडिओला आतापर्यंत 56 हजाराहून अधिक लोकांनी पाहिले आहे. त्याचबरोबर नेटकरी देखील या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. (Viral Video On Social Media )

Uddhav Thackeray । “उद्धव ठाकरे नमकहराम माणूस”, टीका करताना भाजप आमदाराची घसरली जीभ

नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी संताप देखील व्यक्त केला आहे. यावर प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी या डिलिव्हरी बॉय वर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर लोकांनी ऑर्डर केलेले अन्न हा माणूस कसा काय खाऊ शकतो? असा प्रश्न देखील विचारला आहे. त्याचबरोबर काहींनी या डिलिव्हरी बॉय ची बाजू घेत तो खात असलेला अन्न त्याचे स्वतःचे देखील असू शकते असे म्हटले आहे.

Sunny Deol । फक्त डिंपल कपाडिया नाही तर, ‘या’ चार लोकप्रिय अभिनेत्रींसोबत होते सनी देओलचे प्रेमसंबंध

Spread the love