Viral Video । सोशल मीडियावर (Social media) एक अतिशय धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याला पाहून लोक संतापले आहेत. यामध्ये रुग्णालयातील एक कर्मचारी बेडवर पडलेल्या वृद्ध रुग्णाला बेदम मारहाण करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये कर्मचारी रुग्णाच्या पोटावर कोपराने वारंवार मारताना दिसत आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Pune Accident l पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी एकनाथ शिंदेनी घेतला सर्वात मोठा निर्णय!
मायक्रो ब्लॉगिंग साइट X वर व्हिडिओ शेअर करून प्रोफेसर सुधांशू त्रिवेदी नावाच्या युजरने आरोपी डॉक्टर असल्याचा दावा केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘लोकांनी डॉक्टरला देवाचा दर्जा दिला आहे, पण इथे डॉक्टर सैतानाच्या रूपात आहे, बघा, मात्र आरोपी हा डॉक्टर नसून वॉर्ड बॉय किंवा इतर कर्मचारी आहे.’ . पण या 20 सेकंदाच्या क्लिपने सर्वांनाच धक्का दिला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रूग्णालयातील कर्मचारी आधी रूग्णाच्या बेडजवळचा पडदा हटवताना आणि नंतर तो बंद करताना दिसत आहेत. यानंतर तो रुग्णाच्या पोटावर कोपराने मारू लागतो. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की रुग्ण असहाय्यपणे त्याचे वार सहन करत आहे. सुदैवाने कर्मचाऱ्यांची ही कृती तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली, अन्यथा या घटनेवर कोणाचाही विश्वास बसला नसता. मात्र, त्या व्यक्तीची नजर कॅमेऱ्यावर पडताच तो घटनास्थळावरून पळून जातो.
लोग डॉक्टर को भगवान का दर्जा दिए है
— Prof. Sudhanshu Trivedi (@Sudanshutrivedi) June 24, 2024
परंतु यहाँ डॉक्टर- शैतान का रूप में है देखिए 😳😳 pic.twitter.com/y8BrEj386x