Viral Video | मोठी बातमी! क्रिकेटच्या मैदानात दोन संघांमध्ये तुफान हाणामारी; पाहा व्हिडीओ

Viral video

Viral Video | क्रिकेटच्या मैदानामध्ये बहुतेक जास्त प्रमाणात भांडण होत नाहीत. कधी एखाद्या दोन खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली तर होते. मात्र सध्या बांगलादेशमध्ये सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये (Celebrity Cricket League) जोरदार हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याच झालं असं की, या स्पर्धेत मुस्तफा कमाल रियाज आणि दीपांकर दीपन या दोन संघात सामना सुरु होता. यावेळी एका निर्णयामुळे दोन्ही संघात वाद झाला त्यानंतर हा वाद एवढा वाढला की त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

OBC Reservation । अखेर ओबीसी समाजाचे आंदोलन मागे, फडणवीस म्हणाले; “आरक्षण देण्याची भूमिका आहे पण..”

या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये जोरदार हाणामारी झाली. हे दृष्य पाहून नेमकं हे क्रिकेटचं मैदाना आहे की, डब्ल्यूडब्ल्यूई आखाडा असा अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. माहितीनुसार या घटनेमध्ये ६ जण जखमी झाले आहे.

Menstrual cycle । मोठी बातमी! मासिक पाळी दरम्यान विद्यार्थिनींना मिळणार सुट्टी, ‘या’ विद्यापीठाचा निर्णय

व्हायरल झालेला व्हिडीओ हा Saif Ahmed या ट्विटर अकाउनवरून शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून. अनेकांनी या व्हिडिओवर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे. काही जणांनी संताप देखील व्यक्त केला आहे.

Taarak Mehta । चाहत्यांना मोठा धक्का! जेठालालची मालिकेतून होणार एक्झिट, स्वतःच दिली माहिती

Spread the love