Viral News । चालत्या वाहनांमधून हात किंवा डोके बाहेर काढू नका अशा सूचना कायमच दिल्या जातात. कारण वाहनाचा वेग हा जास्त असतो आणि गाडीच्या शेजारी जर एखादी दुसरी गाडी आली किंवा लाईटचा पोल आला तर तुमच्या डोक्याला किंवा हाताला गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. आतापर्यंत अशी कितीतरी प्रकरण समोर आली आहेत. मात्र तरी देखील अनेक लोक या सूचनांकडे दुर्लक्ष करतात मात्र सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम देखील खूप वाईट होतात. असाच काहीसा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Mumbai News । रुग्णालयामधून २० दिवसाच्या बाळाची चोरी, सीसीटीव्ही मध्ये घटना कैद; पहा VIDEO
सध्या सोशल मीडियावर एका अतिउत्साही मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुलाचं डोकं कारच्या खिडकीमध्ये अडकल्याचं दिसत आहे. काही केल्या कारची काच खाली येत नव्हती. त्यामुळे मानेवर ताण वाढला आणि शेवटी या मुलासोबत काय घडलं हे तुम्हीच पहा. व्हिडिओचा शेवट पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल
Corona Update | ब्रेकिंग! क्रिकेट विश्वातून मोठी बातमी! स्टार खेळाडूला झाली कोरोनाची लागण
पहा व्हिडिओ
The kid get stuck on the window going up pic.twitter.com/r6j5n5zFAa
— CCTV IDIOTS (@cctvidiots) January 10, 2024
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. CCTV IDIOTS या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लोकांनी अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे.