Video | उर्फी जावेदचा ‘तो’ व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले; म्हणाले, “तुला काही…”

Video | Urfi Javed's 'To' video angered netizens; Said, "Do you have any..."

अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या हटके स्टाईलमुळे सतत चर्चेत असते. उर्फी तिच्या अनोख्या आणि बोल्ड ड्रेसिंग स्टाइलमुळे नेहमीच लाईमलाइटमध्ये असते. अनेक नेटकरी तिला तिच्या फॅशन सेन्ससाठी ट्रोल करत असतात. परंतु तरीही उर्फी तिच्या स्टाइलिंगसह सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. नुकताच उर्फीचा एक व्हिडिओ सोशल (Urfi Video ) मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

मोठी दुर्घटना! बोट उलटली अन् १०० लोकांचा बुडून मृत्यू, अनेक जण बेपत्ता

उर्फी सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. उर्फीचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. नेटकरी तिच्या प्रत्येक पोस्टवर भरभरून लाइक आणि कमेंट करत असतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये उर्फीने सर्वांना हादरवून टाकणार लूक केला आहे. या आगोदर उर्फीने झाडाच्या सालीपासून कपडे तयार केलेली परिधान केली होती.

Ajit Pawar । अजित पवार यांचा मोठा दावा; म्हणाले, “मला शिंदे गटाच्या काही खासदारांनी…”

इतकंच नव्हे तर उर्फीने आता पिझ्झाचा स्टाईल बिकनी म्हणून वापर केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये उर्फी पिझ्झा खाताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत. नेटकर्‍यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने म्हटले की, ‘अग बाई अन्नाला तरी सोड.’ दुसर्‍याने म्हटले की, ‘अशा आयडिया उर्फी जावेद हिच्याकडे कुठून येतात हेच मला कळत नाही.’

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *