“उद्या कपडे न घालताच…”,दीपिकाच्या बिकीनीवर मुकेश खन्नांनी दिली प्रतिक्रिया

"Undressed tomorrow...", Mukesh Khanna reacted to Deepika's bikini

मुंबई: अभिनेता शाहरुख खान याचा ‘पठाण’ (Pathan) चित्रपट मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात दीपिका पदुकोण हिने परिधान केलेल्या कपड्यांवरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. या गाण्यात दीपिका पदुकोण ( Dipika Padukon) भगव्या रंगाच्या बिकनीमध्ये दिसत आहे. यामुळे वाद निर्माण झाला असून यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता प्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

”राज्यपाल कोश्यारी यांना एक मिनिटं सुद्धा खुर्चीवर बसण्याच्या अधिकार नाही” – संजय राऊत

मुकेश खन्ना म्हणाले, “आपला देश काही स्पेन नाही जे अशा प्रकारची गाणी प्रदर्शित करत आहे. आज अर्ध्या कपड्यांमध्ये गाणी बनवताय उद्या कपडे न घालताच गाणी बनवली जातील. मला हेच समजत नाही सेन्सॉर अशा गाण्यांना परवानगी देतो कसा? असं मुकेश खन्ना यांनी म्हंटल आहे.

बिग ब्रेकिंग! शिंदे सरकार कोसळणार?; ‘या’ बड्या नेत्याचा दावा

दरम्यान, या नवीन वादामुळे शाहरुख खानचा पठाण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील विनीत जिंदाल (Vinit Jindal) यांनी गुरुवारी ( दि. 15) माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. तसेच या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन अयोध्येतील हनुमान गढीचे महंत राजू दास यांनी केले आहे. राजू दास यांनी व्हिडीओ शेअर करत ” ज्या चित्रपटगृहांमध्ये पठाण दाखवला जाईल, त्या चित्रपटगृहांना लोकांनी आग लावावी.” असे लोकांना सांगितले आहे.

सरपंच पदासाठी सासू विरुद्ध सून अशी लढत; कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *