Site icon e लोकहित | Marathi News

Uddhav Thackeray । उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा! म्हणाले; “भाजपमध्ये सगळे आयाराम…

Uddhav Thackeray targets BJP! said; "In BJP, all the ayarams…

Uddhav Thackeray । हिंगोली : वेगवेगळ्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपाला (BJP) ठाकरे गटाच्या टीकेला सामोरे जावे लागते. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची हिंगोलीमध्ये (Hingoli) आयोजित करण्यात आली होती. यावेळी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावरही टीका केली आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar । सत्तेसाठी नाही तर ‘या’ कारणामुळे अजित पवार भाजपसोबत, महाविकास आघाडीच्या बड्या नेत्याचा दावा

शिवसेना (Shivsena) आणि भाजपची २५ ते ३० वर्षे युती होती. भाजपसाठी ज्या कार्यकर्त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य झिजवले. त्यांच्या मेहनतीवर हा पक्ष मोठा झाला. परंतु तेच कार्यकर्ते आज उपाशी राहिले आहेत. तर तुपाशी मात्रा आयाराम झालेले आहेत. मला आता त्या कार्यकर्त्यांची कीव येत आहे. त्यासाठी या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना विचारला आहे.

Amit Thackeray । मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसे आक्रमक, सरकारविरोधात आजपासून जागर पदयात्रा

डबल इंजिन सरकारमध्ये अजित पवारांचा डबा

पुढे ते म्हणाले की, “रात्रदिवंस मेहनत करून कार्यकर्त्यांनी पक्षाची वाढ केली. परंतु आज त्याच कार्यकर्त्यांना सतरंज्या उचलाव्या लागत आहेत. या सरकारचा त्यांना काहीच लाभ झाला नाही. भाजप फक्त कार्यकर्त्यांना वापर करून घेते. शिवसेनेत फूट पाडल्यानंतर डबल इंजिन सरकारमध्ये अजित पवार यांचा डबा लागला आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे

Cotton Farming । दिलासादायक! यावर्षी कापसाला मिळणार चांगले दर, जाणून घ्या यामागचं कारण

टरबूजालाही पाणी द्यावं लागतं

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जपान दौऱ्यावरुन त्यांनी टीका केली आहे. ‘एकीकडे राज्यात दुष्काळ पडला आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस जपान दौऱ्यावर आहेत. त्यांना तर मी बोलणं सोडलं आहे. मागे मी त्यांना कलंक, फडतूस बोललो, तर गोंधळ झाला होता. परंतु आता मी त्यांना थापाड्या म्हणणार होतो, पण आता तसे म्हणत नाही. टरबूजालाही पाणी द्यावं लागतं’, असे ठाकरे म्हणाले आहेत.

Social Security । कोट्यवधी ग्राहकांसाठी SBI ने आणली नवीन सेवा, होणार मोठा फायदा

Spread the love
Exit mobile version