Amit Thackeray । मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसे आक्रमक, सरकारविरोधात आजपासून जागर पदयात्रा

MNS Aggressive for Mumbai-Goa Highway, Jagar Padayatra from today against Govt

Amit Thackeray । मुंबई : मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai to Goa Highway) खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. जास्त खड्डे असल्याने वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय अपघाताचे प्रमाणदेखील वाढत आहे. आता या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. आज पहाटेपासून जागर पदयात्रेला (MNS Jagar Padayatra) सुरुवात झाली आहे. (Latest Marathi News)

Cotton Farming । दिलासादायक! यावर्षी कापसाला मिळणार चांगले दर, जाणून घ्या यामागचं कारण

ही पदयात्रा तीन टप्प्यात पार पडणार असून पहिल्या दोन टप्प्यात चालत ही पदयात्रा होणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यामध्ये गाव जनजागृती अभियान राबवले जाणार आहे. सरकारला जागं करण्यासाठी ही जागर यात्रा काढली जात आहे. मागील १७ वर्षापासून या महामार्गाचे काम रखडलेलं आहे. दरम्यान, यापूर्वीच भाजप आणि मनसेमध्ये (BJP vs MNS) वाद सुरु आहे. या आंदोलनामुळे त्यात आणखी भर पडली आहे.

Social Security । कोट्यवधी ग्राहकांसाठी SBI ने आणली नवीन सेवा, होणार मोठा फायदा

मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पनवेलमधील मेळाव्यानंतर मनसे खड्ड्यांच्या मुद्द्यावरून चांगलीच आक्रमक झाली आहे. अशातच सतत पक्षाकडून मुंबई गोवा महामार्गाच्या मुद्द्याला हात घातला जात असताना तरीही या महामार्गाची अवस्था जैसे थेच आहे. त्यामुळे आता मनसेच्या आंदोलनाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Dream Girl 2 । ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपटाने दुसऱ्या दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

Spread the love