“प्रत्येक आमदाराला सांगतात तुला मंत्रिपद देऊ मात्र, एके दिवशी सगळेच आमदार निघून जातील”; अजित पवारांचे मोठे वक्तव्य

“They tell every MLA that they will give you a ministerial post, but one day all the MLAs will leave”; Big statement of Ajit Pawar

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली आणि भाजपशी युती करून राज्यात नवीन सरकार स्थापन केले. यांनतर विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर सतत टीका करत आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार हे सरकारला धारेवर धरत असतात. आता अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरुनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

शरद पवार यांना मोठा धक्का! ‘हे’ राष्ट्रवादीचे आमदार भाजपसोबत जाणार?

अजित पवार म्हणाले, मागच्या अनेक दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक आमदाराला मंत्रिपदाला देऊ असं सांगतायेत मात्र मंत्रिमंडळ विस्तार केला नाही तर जे आमदार सध्या आहेत ते देखील निघून जातील असा इशारा अजित पवार यांनी यावेळी दिला आहे.

ब्रेकिंग! भोजपुरी गायक पवनसिंहवर कार्यक्रमामध्ये दगडफेक; तोंडाला लागला जबर मार तातडीने केलं रुग्णालयात दाखल

त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून देखील अजित पवारांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. अजित पवार म्हणाले, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा वेळी आपण शेतकऱ्याच्या पाठिशी उभं रहायला पाहिजे याबद्दल तर हो बोलायला तयार नाहीत. अशा शब्दांत अजित पवार यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

मोठी बातमी! ‘या’ 2 कंपन्यांच्या शेअर्समधून झुनझुनवाला यांनी कमावले 650 कोटी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *