Adipurush । ‘आदिपुरुष’ च्या या 10 मोठ्या चुका ठरत आहेत वादाचं कारण, चित्रपट पाहण्यापूर्वी एकदा पहाच

Adipurush

Adipurush । नुकताच बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असणारा ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे बजेट 500 कोटी रुपये आहे. ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर (Adipurush Trailer) रिलीज होताच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. तीन तासात संपूर्ण रामायण (Ramayan) दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नाही तर हनुमानांसाठी चित्रपटगृहात एक सीट राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु या चित्रपटात 10 मोठ्या चुका झाल्या आहेत. यावर आता चर्चा सुरु आहे.

आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! ठाकरे गटाच्या नॉट रिचेबल मनीषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

या आहेत चुका

  • या चित्रपटात सीताहरण आणि राम-रावणाच्या युद्धावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून इतर काही पात्रांना चित्रपटात स्क्रीन-टाइम द्यायला हवा होता.
  • लंकेतील राक्षसाचा लूक पाहता हॉलिवूड चित्रपटांची आठवण येते.
  • व्हिएफएक्सवर (Adipurush VFX) जास्त खर्च केला असला तरी ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले नाही. त्यामुळे रावण्याच्या चालण्याची पद्धत मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटही संजय दत्तसारखी वाटत आहे.
  • रावणाची लंका यात काळ्या रंगाची दाखवली आहे. परंतु ती सोन्याची आहे हे सगळ्यांना माहिती आहे.
  • तसेच रावण पुष्पक विमानाऐवजी एका पक्षावर विराजमान आहे. तसेच त्याची हेअरकट चर्चेचा विषय बनत आहे.
  • यात सनी सिंहने लक्ष्मणाची चांगली भूमिका साकारली असली तरी त्याचे संवाद कमी दाखवले आहे.
  • राम सेतूची गोष्ट स्पष्ट दाखवली नाही.
  • एका मायावी राक्षसाने जानकीचं रुप धारण केल्याने मूळ कथेपेक्षा सीन वेगळा जाणवतो.
  • कथेला न शोभणारे संवाद यात वापरल्याने यावर टीका होत आहे.
  • रावणाचा पुत्र इंद्रजितच्या अंगावर टॅटू दाखवला आहे. कुंभकरणाचे पात्रदेखील काही वेळेपुरते दाखवले आहे.

Gautami Patil । गौतमीच्या कार्यक्रमात पुन्हा राडा; हुल्लडबाजांमुळे दहा मिनिटात कार्यक्रम पडला बंद

इतकेच नाही तर यावर आता हिंदू सेनेने दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी सिनेमा प्रमाणपत्र देऊ नये, अशी मोठी मागणी केली. तसेच रामायण, राम आणि देशाच्या संस्कृतीची खिल्ली उडवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे बडे नेते भाजपमध्ये करणार प्रवेश; महाडिकांचा दावा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *