
Politics News | काल केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) हस्ते पुण्यातील चांदणी चौकाचं लोकार्पण झाले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची गुप्त बैठक झाल्याचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. विशेष म्हणजे या भेटीदरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Ajit Pawar met Sharad Pawar)
Google Maps Offline । बिनधास्त फिरायला जा! इंटरनेटशिवायही ‘असे’ चालेल गुगल मॅप
त्यांच्या या भेटीनंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनीदेखील माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवार आणि अजित पवार यांची भेट ही एक सामान्य भेट असू शकते. देशाला प्रगतीपथावर न्यायचे असेल तर आपण सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले पाहिजे हे समजावून सांगण्यासाठी अजित पवारांनी काल शरद पवार यांची भेट घेतली असावी, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
तसेच मुनगंटीवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर टीका केली आहे. “राहुल गांधी हे देश पुढे नेऊ शकत नाही. हे अजित पवार यांना माहिती आहे. त्यांना अल्लडपणा अजितदादांना समजला आहे,” अशी खोचक टीकाही मुनगंटीवार यांनी केली आहे. दरम्यान, काका-पुतण्याच्या भेटीमुळे राज्याचे समीकरण पुन्हा एकदा बदलू शकते, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.
Independence Day । सरकारचा मोठा निर्णय! 15 ऑगस्टपासून सरकारी रुग्णालयांमध्ये सर्व वैद्यकीय सेवा मोफत