Google Maps Offline । बिनधास्त फिरायला जा! इंटरनेटशिवायही ‘असे’ चालेल गुगल मॅप

Go for a walk! Google map will work 'like this' even without internet

Google Maps Offline । सध्याच्या काळात इंटरनेट (Internet) खूप गरजेचे आहे. इंटरनेटशिवाय अनेकांचे पानही हलत नाही, असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. याच इंटरनेटमुळे सगळे जग मुठीत आले आहे. सर्व कामे आता चुटकीसरशी होऊ लागली आहेत. मग ती खरेदी असो किंवा कोणतेही बँकिंग काम (Banking work) असो. परंतु जर अचानक इंटरनेट गेले तर? (Latest Marathi News)

Politics News । राज्यामध्ये पुन्हा मोठा राजकीय भूकंप? अजित पवार-शरद पवारांच्या भेटींवर चर्चांना उधान; काँग्रेस नेत्याचे मोठे वक्तव्य

अनेकदा फिरायला गेल्यावर इंटरनेट लवकर येत नाही. त्यामुळे पर्यटकांना गुगल मॅपवर (Google Map) अचूक मार्ग सापडत नाही. पण जर गुगल मॅपच व्यवस्थित काम करत नसेल तर पुढचा प्रवास करता येत नाही. पर्यटकांची हीच समस्या लक्षात घेता आता गुगलने मॅपचे एक शानदार फीचर (Google Map Feature) आणले आहे. ज्यामुळे पर्यटकांना इंटरनेट नसेल तरीही रस्ता समजेल. कसे ते जाणून घ्या.

Independence Day । सरकारचा मोठा निर्णय! 15 ऑगस्टपासून सरकारी रुग्णालयांमध्ये सर्व वैद्यकीय सेवा मोफत

गुगल मॅप्स ऑफलाईन फीचर

गुगल मॅप्स ऑफलाईन असे या फीचरचे नाव असून त्यात तुम्हाला फिरायला जाण्यापूर्वी एखाद्या ठिकाणापर्यंतचा सहज रस्ता डाऊनलोड करता येईल. त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर गुगल मॅप्स हे अ‍ॅप उघडून ज्या ठिकाणी फिरायला जायचे आहे त्या जागेचे नाव सर्च करा. आता त्यानंतर अ‍ॅड्रेस बारवर क्लिक करावे. पुढे त्यात more पर्यायावर टॅप केल्यास Download Offline Map हा पर्याय तुमच्यासमोर येईल. त्यावर क्लिक करून तुम्हाला मॅप डाऊनलोड करता येईल.

राजकीय हालचालींना वेग! शरद पवार आणि अजित पवारांची गुप्त बैठक

पुढच्या आठवड्यात अनेक सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे अनेकजण आपल्या मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत फिरायला जाण्याची तयारी करत आहेत. तुम्हीही आता या फीचरच्या मदतीने बिनधास्त कोठेही फिरायला जाऊ शकता.

flooded । पूरग्रस्त भागातील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत; लवकर मदत जाहीर केली नाही तर आंदोलनाचा इशारा

Spread the love