मुंबई अगदी 3 वर्षापूर्वी याचवेळी कोरोना या महाभयंकर विषाणूमूळे आपला देश बंद पडला होता. त्यानंतर लाॅकडाऊन मास्क यासगळ्यागोष्टीचा अनुभव आला होता. आता गेली 1 वर्ष सगळ्या गोष्टी सुरळित झाल्या आहेत असं वाटत असताना कोरोनाने पुन्हा डोकंवर काढलं आहे.
मोठी बातमी! खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खालावली
कोरोनाचा XBB 1.16 या नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा चिंताजनक परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये बहुतांश लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. हा आलेख दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
भर कार्यक्रमात गौतमीला टक्कर देणारा पवन नेमका आहे तरी कोण? पाहा त्याचे व्हायरल Video
मंगळवारी आलेल्या माहितीनुसार हा कोरोना रुग्णाचा आकडा चिंताजनक आहे. सोमवारी 205 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. याच रुग्णांचा आकडा मंगळवारी 450 इतका पोहचला आहे. एकाच दिवसात करोना रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने चिंता वाढली आहे.
परिणीती चोप्राचं ठरलं! या व्यक्तीसोबत बांधणार लग्नगाठ
पुण्यात 151, छत्रपती संभाजीनगर मध्ये 24 तर ठाण्यात 23 रुग्ण आढळून आले आहेत., अहमदनगरमध्ये 11 तर अमरावती 8 आणि मुंबई व रायगड परिसरातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मुंबईत मंगळवारी करोनाचे एकूण 135 नवे रुग्ण आढळून आले आहेत.