सामानासह फरार झालेला कॅब ड्रायव्हर तासाभराने आला अन् नशेत…; उर्फीने सांगितला ‘तो’ किस्सा

The cab driver who absconded with the luggage came after an hour and was drunk…; Urfi told 'that' story

आपल्या गजब फॅशनमुळे प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद (Urfi Jawed) होय. उर्फी तिच्या बिंधास्त वक्तव्यामुळे देखील अनेकदा चर्चेत येते. उर्फी जावेद तिच्या अतरंगी फॅशनमुले कायम चर्चेत असते. यामुळे तिच्या फॅशन सेन्सचे कौतुकही होते, मात्र त्याहून जास्त वेळा तिला टीकांना सामोरे जावे लागते. सध्या उर्फीने एक ट्विट केले आहे. ते ट्विट (Tweet) सोशल मीडियावर (social media) तुफान व्हायरल होत आहे.

शेतकऱ्याला १० पोती कांदा विकून मिळाला फक्त २ रुपयांचा चेक; ‘या’

आपल्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद हिने कॅब ड्रायव्हरविरोधात तक्रार केली आहे. यादरम्यान तिने उबर ॲपवरून कॅब घेतली होती. पण त्यावेळीचा तिचा अनुभव अजिबात चांगला नव्हता. कॅबचा अनुभव शेअर करत उर्फी जावेदने ट्विटरवर तक्रार केली. तसेच उबर कृपया काहीतरी करा. हे महिलांच्या सुरक्षिततेच्या विरोधात आहे, असे म्हणत खंत व्यक्त केली.

अभिनेत्री ह्रता दुर्गुळेची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल; पोस्ट शेअर करत

ट्विट करताना उर्फीने लिहिले की, मला उबर कॅब सेवेचा खूप वाईट अनुभव आला आहे. मी दिल्लीत होते. मी सहा तासांसाठी कॅब बुक केली होती. विमानतळावर परतताना मी जेवणासाठी थांबले होते. यादरम्यान ड्रायव्हर माझे सामान घेऊन बेपत्ता झाला होता. इतक्यात माझ्या एका मित्राने मला मदत केली आणि मग ड्रायव्हर कसा तरी शोधून काढले. सुमारे तासाभरानंतर ड्रायव्हर नशेत परतला. उर्फीच्या या ट्विटरवर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *