Sanjay Raut । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! संजय राऊत यांनी सांगितले काका-पुतण्याच्या भेटीमागचे खरं कारण

The biggest news of the moment! Sanjay Raut told the real reason behind the uncle-nephew meeting

Sanjay Raut । मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) बंड करत शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे पक्षात दोन गट पडले आहेत. परंतु, बंडानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीगाठी वाढल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यावर आता खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. (Latest Marathi News)

PPF Investment । मस्तच.. गुंतवणूक केली नाही तर पीपीएफ योजनेत मिळते व्याज

संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “शरद पवारांनी अनेक संस्था उभारल्या आहेत. त्यावर अजित पवारांनाही त्यांनी घेतले आहे. अजित पवार यांनी शरद पवारांच्या हयातीतच पक्षावर दावा केला आहे. त्यापुढे या संस्थांचे काय? या संस्थांचे पुढे काय करायचे यावर चर्चा करण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली आहे,” असा दावा राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

Onion Price । कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, पुन्हा घसरले दर

दरम्यान, पक्षात फूट पडूनही या दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये कोणती चर्चा सुरू आहे? पक्षावर दावा करणारे अजित पवार हे सतत शरद पवार यांची का भेट घेत आहेत? अजित पवार यांच्या भाजपसोबतच्या हातमिळवणी मागे खरोखरच शरद पवार यांचीच खेळी आहे का? असा सवाल अजूनही उपस्थित केला जात आहे. परंतु, याचा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये आपल्याला दिसून येईल.

Traffic Rule । काय सांगता? हेल्मेट घातले नाही म्हणून रिक्षाचालकाला ठोठावला दंड

Spread the love