वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar ) यांनी काल अचानक औरंगाबादमध्ये जावून औरंगजेबाच्या समाधीला भेट दिली. प्रकाश आंबेडकर यांनी अचानक औरंगाबादमध्ये जावून औरंगजेबाच्या समाधीला भेट दिली त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजकीय वातावरण देखील चांगलेच तापल्याचे दिसत आहे.
ब्रेकिंग! भाजप नेत्यांची घरे जाळण्याचा प्रयत्न, कार्यालयांवर हल्ले
प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या समाधीला भेट दिली त्या ठिकाणी झुकलेही यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. यामुळे आता अनेक जण याबाबत आक्रमक झाले आहेत. यामध्येच आता हिंदुत्ववादी संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या अडचणी वाढणार असल्याचं चित्र दिसत आहे. हिंदुत्ववादी संघटनेने तर एक मोठी मागणी केली आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची घरासमोरच नेमकी कशी झाली हत्या? अंगावर शहारे आणणारी घटना
हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “औरंगजेबाच्या कबरीवर प्रकाश आंबेडकर यांनी माथा टेकून शिवभक्तांना दुखावलं आहे. त्यामुळे शिवभक्त चिडण्याआधीच सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी. त्यांच्यावर कडक कलम लावून त्यांना अटक देखील करावी अशी आमची भावना आहे.” असं आनंद दवे यांनी म्हटलं आहे.
दिवसाढवळ्या तरुणाने केली महिलेला बेदम मारहाण; व्हिडीओ झाला व्हायरल