Team India Hockey । पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024 ) मधील पुरुष हॉकीचा कांस्यपदक सामना भारत आणि स्पेन संघांमध्ये खेळला गेला. भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाचा सामना जिंकण्यासाठी आला होता आणि तो यशस्वीही झाला. भारताने स्पेनचा 2-1 असा पराभव करत कांस्यपदक जिंकले. त्याचबरोबर ऑलिम्पिकच्या इतिहासातील भारताचे हे १३ वे पदक आहे.
भारताचा अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेशने शेवटच्या क्वार्टरमध्ये अप्रतिम खेळ दाखवला. त्याने शेवटच्या क्षणी दोन गोल वाचवून भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
Assembly Elections । विधानसभा निवडणूक: भाजपची पहिली यादी कधी येणार? समोर आली मोठी अपडेट
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा प्रवास
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने न्यूझीलंडचा ३-२ असा पराभव करून आपल्या मोहिमेला सुरुवात केली. यानंतर अर्जेंटिनाविरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत सुटला. तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने आयर्लंडचा 2-0 असा पराभव केला. यानंतर बेल्जियमविरुद्ध १-२ असा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारतीय संघाने ऐतिहासिक विजय संपादन केला आणि पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रिटनचा 4-2 असा पराभव केला. पण भारतीय संघ उपांत्य फेरीत 2-3 असा पराभूत झाला.
Ajit pawar । ‘मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर मिळाली असती तर…’, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे वक्तव्य