Supriya Sule । प्रकाश आंबेडकरांशी युती करण्याबाबत सुप्रिया सुळे यांनी केले सर्वात मोठे वक्तव्य

Supriya Sule And Prakash Ambedkar

Supriya Sule । मागच्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडल्या आहेत. मागच्या काही दिवसापासून प्रकाश आंबेडकर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युती करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आता यावर सुप्रिया सुळे यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी (व्हीबीए) आघाडी करण्याबाबत राष्ट्रवादीची भूमिका सकारात्मक असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Beed Accident News । कंटेनर- पिकअपचा भीषण अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू

त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना-यूबीटी) विरोधी आघाडी महाविकास आघाडीचा भाग आहेत. त्याच वेळी, व्हीबीए नेत्यांनी अनेकदा भारतीय जनता पक्षाचा (भाजप) पराभव करण्यासाठी त्यांची संघटना आणि तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणुका लढवण्याचा करार करण्याची गरज असल्याचे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Accident Video । लाईव्ह व्हिडीओमध्ये रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल सांगत असतानाच घडला भीषण अपघात, पहा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ

त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीस यांनी धनगरांचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करण्याचे आणि ब्राह्मण समाजासाठी परशुराम फायनान्शिअल कॉर्पोरेशन स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु या बाबतीत काहीही झाले नाही, असा आरोप देखील त्यांनी केला आहे “.

OpenAI सीईओने बेस्टफ्रेंडसोबत केले लग्न, अनेक दिवसांपासून करत होते डेट; लवकरच मूलही होणार

Spread the love