
Supriya Sule । केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) अजित पवार यांचा गट (Ajit Pawar group) खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) असल्याचा निर्णय दिला आहे. तसेच पक्षाचे चिन्ह देखील अजित पवार गटाला दिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शरद पवार गटाला (Sharad Pawar group) खूप मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. (Latest marathi news) या सर्व घडामोडी घडत असतानाच सुप्रिया सुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
शरद पवार यांना निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अजित पवार गटाने केल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा धक्कादायक गौप्यस्फोट केला. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
Indapur News । अक्षय साळुंखे यांची राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्ष इंदापूर तालुक्यासाठी निवड
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आमदार अपात्रतेची याचिका प्रलंबित असताना पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय कसा घेतला? हा निर्णय घेताना पक्षाच्या संविधानाचा विचार केला नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.