Supriya Sule । दुष्काळ, अवकाळीमुळे शेतकरी मोठ्या संकटात, सरसकट कर्जमाफी करा – सुप्रिया सुळे

Supriya Sule

Supriya Sule । सध्या हवामानामध्ये मोठे बदल होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पावसाचा सामना करावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी आता दुहेरी नैसर्गिक संकटात सापडले आहेत. हातातोंडाशी आलेली पिके पावसामुळे नष्ट होत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान संकटाच्या वेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटल आहे. (Supriya Sule)

Viral Video । आधी रस्त्यावर फेकले, नंतर वृद्ध महिलेला बेदम मारहाण केली, हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ आला समोर

त्याचबरोबर नुकसानग्रस्त भागात सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्यातील शेतकरी राजा आता अडचणी सापडला आहे. एकीकडे राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे तर दोन दिवसापासून अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस होत आहे. दोन्हीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत आपण सर्वांनीच संवेदनशीलपणे कामाला लागलं पाहिजे असं सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटलं आहे.

Sharad Pawar । मुंबईत पावसात भिजत शरद पवारांनी ठोकले भाषण, 2019 च्या आठवणी ताज्या

माझी राज्य सरकारकडे मागणी आहे की दिल्लीतून तातडीने टीम राज्यात बोलावी आणि केंद्राच्या टीमकडून राज्यातील परिस्थिती पाहणी करावी. राज्यातील संपूर्ण यंत्रणा पूर्ण ताकतीने कामाला लावा. केंद्र सरकारकडून राज्याला जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे खासदार राज्यसभेत आणि लोकसभेत देखील हा विषय मांडतील. कष्टकरी शेतकऱ्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी उभी असल्याचे देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

Pune-Ahmadnagar Highway Accident । मोठी बातमी! पुणे-नगर महामार्गावर गॅस टँकरचा भीषण अपघात

Spread the love