Sunita Williams | मोठी बातमी! ९ महिन्यानंतर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे सुखरूप पृथ्वीवर आगमन

Sunita Williams

Sunita Williams | भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे 9 महिन्यांच्या अंतराळ मोहिमेनंतर सुखरूप पृथ्वीवर आगमन झाले आहे. आज पहाटे (भारतीय वेळेनुसार) 3.30 च्या सुमारास त्यांनी फ्लोरिडाच्या किनारी सुरक्षितपणे पाऊल ठेवले. त्यांची ही ऐतिहासिक अंतराळ मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे, आणि या क्षणी भारतात आणि अमेरिकेतही आनंदाची लाट आहे.

Pune Crime । धक्कादायक! पुण्यात रंग लावण्याच्या वादातून कोयता हल्ला, तरुण गंभीर जखमी

सुनिता आणि बुच यांचे पुनरागमन स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानाद्वारे झाले. 19 मार्च 2025 रोजी, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून परतल्यानंतर काही तासांनी त्यांनी मेक्सिकोच्या आखातात पॅराशूटद्वारे सुरक्षित उतरण केली. यानंतर, फ्लोरिडातील टालाहसी किनाऱ्यावर स्प्लॅशडाउन झाला. नासाने याबद्दल एक व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये अंतराळवीर पृथ्वीवर लँड करताना दिसत आहेत.

Supriya Sule । बरं झालं पक्ष फुटला, सुप्रिया सुळे यांचं धक्कादायक वक्तव्य

सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना 2024 मध्ये 5 जून रोजी केप कॅनवेरलमधून उड्डाण करण्यात आले होते. तेव्हा, या दोन अंतराळवीरांना आठ दिवसांच्या मिशनसाठी पाठविण्यात आले होते. पण, काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचे अंतराळ स्थानकावर अडकलेले होते. हीलियमची गळती आणि यानाची गती कमी होणे यामुळे त्यांना अधिक काळ अंतराळात राहावे लागले. त्यांचं पृथ्वीवर परत येणं अनेक वेळा लांबले होते, परंतु अखेर आज ते यशस्वीपणे लँड झाले आणि त्यांच्या कुटुंबीयांसह सर्वांना दिलासा मिळाला.

Central Bank l धक्कादायक! सेंट्रल बँकेत भीषण आग, कागदपत्रे आणि पैसे जळून खाक

Spread the love