Sukhdev Singh Gogamedi । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! सुखदेव सिंह गोगामेडींच्या मारेकऱ्यांना अटक, ‘ती’ एक चूक पडली महागात

Sukhdev Singh Gogamedi

Sukhdev Singh Gogamedi । जयपूर, राजस्थानमध्ये श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची बदमाशांनी गोळ्या झाडून हत्या केली. आता दिल्ली आणि राजस्थानच्या पोलिसांनी चंदीगडमधील एका हॉटेलमधून या घटनेत सहभागी असलेल्या दोन शूटर्ससह तिघांना अटक केली आहे. रोहित राठोड, नितीन फौजी आणि उधम अशी त्यांची नावे आहेत.

Animal movie । मोठी बातमी! अॅनिमल चित्रपटातील काढून टाकलेले सीन सोशल मिडीयावर व्हायरल, ‘नशेच्या धुंदीत प्रायव्हेट जेटमध्ये….’

अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, पोलिस हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा उधम देखील गुन्ह्यात सहभागी असलेल्या रोहित आणि नितीन या दोन आरोपींसोबत उपस्थित होते. गुन्हा केल्यानंतर रोहित राठोड आणि नितीन फौजी पोलिसांना चकमा देण्यासाठी सतत त्यांची जागा बदलत होते. जयपूरमध्ये सुखदेव सिंगची हत्या केल्यानंतर दोघेही हरियाणातील हिस्सारला पोहोचले. यानंतर पुन्हा बसने मनालीला पळून गेला. पण, दोघेही इथेच थांबले नाहीत, ते इथूनच चंदीगडला पोहोचले. मात्र, दोन्ही नराधमांनी चूक केली. या चोरट्यांनी त्यांचे मोबाईल चालू ठेवले होते. त्यांच्या मोबाईल लोकेशनच्या मदतीने पोलिसांनी चंदीगड गाठले आणि दोघांनाही अटक केली.

Sharad Pawar । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! शरद पवारांना मोठा धक्का, दोन बड्या नेत्यांचा अजित पवार गटात प्रवेश

17 राऊंड गोळीबार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी एकूण 17 राउंड फायर केले. गुन्हा केल्यानंतर हल्लेखोरांनी बंदुकाही लपवून ठेवल्या. जाताना त्याच्याकडे फक्त रोख रक्कम आणि मोबाईल होता. कोणाला त्याच्यावर संशय येऊ नये म्हणून त्याने हे केले. हे दोन्ही गुन्हेगार वीरेंद्र चहान आणि दानाराम यांच्या सतत संपर्कात होते, असे सांगण्यात येत आहे. या दोघांच्या सांगण्यावरून त्याने सुखदेव सिंगचा खून केला.

Supreme Court । नवरा ठेवायचा असे संबंध की… बायको थेट पोहचली कोर्टात, पुढं जे घडलं ते वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Spread the love