Social Media । महिलेने केस धुण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले; आता केले कोटी रुपयांचे घर खरेदी; जाणून घ्या कसे कमावले पैसे?

Social Media

Social Media । इंटरनेट आणि सोशल मीडियाने लोकप्रियता आणि ओळखीसोबत पैसे कमावण्याचे नवे मार्ग खुले केले आहेत. सोशल मीडिया प्रभावक आणि सामग्री निर्माते त्यांच्या अद्वितीय व्हिडिओंद्वारे लोकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होत आहेत. अनेक तरुण तरुणी सोशल मीडियावर व्हिडीओ बनून बक्कळ पैसे कमावत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त तरुण-तरुणी नाही तर वयोवृद्ध व्यक्त देखील सोशल मीडियावर व्हिडीओ बनवून चांगले पैसे कमवत आहेत.

Devendr Fadanvis । सुषमा अंधारेंनी ट्वीट केलेल्या व्हिडिओवर फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

आपण सोशल मीडियावर अनेक कंटेंट क्रिएटर्स पाहतो जो नेहमीच वेगेवेगळा कंटेंट देत असतात. जे इतरांपेक्षा वेगळे असतात आणि तुमचे लक्ष वेधून घेतात. स्कॉटिश महिला Zia O’Shaughnessy या देखीलत्या कंटेंट क्रिएटर्सपैकी एक आहेत. ज्यांनी त्यांच्या केस धुण्याच्या व्हिडिओंद्वारे लाखोच नव्हे तर कोटींची कमाई केली आहे.

Viral Video । मोठी दुर्घटना! कारने अचानक ब्रेक मारला अन्.. BRS नेते केटीआर राव थेट टपावरुन खाली पडले; व्हिडीओ झाला व्हायरल

30 वर्षीय झिया ओ’शॉघनेसी यांनी 2021 मध्ये त्यांची केसांची निगा राखण्याची पद्धत शेअर करण्यासाठी TikTok वर व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली. त्यांचे व्हिडिओ लगेचच प्रेक्षकांना प्रभावित झाले आणि लोकप्रिय झाले. त्यांचा सुरुवातीचा व्हिडीओ, ज्याला त्यांनी Ziya’s Bowl Method असे नाव दिले, तो 35 दशलक्ष वेळा पाहिला गेला. नोकरी सोडल्यानंतर दोन मुलांची आई जियाने कंटेंट क्रिएशनला पूर्णवेळ देण्याचा ठरवलं आणि सध्या त्या करोडो रुपये कमवत आहेत.

Sharad Pawar । मोठी बातमी! निवडणूक आयोगाच्या सुनावणीला शरद पवार स्वत: हजर

एक कोटीचे घर बांधले

द सनच्या वृत्तानुसार, जिया यांच्यावर एकेकाळी 8 लाख रुपयांचे कर्ज होते, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्यांच्या व्हिडिओच्या लोकप्रियतेनंतर त्यांना इतके चांगले पैसे मिळू लागले की त्यांनी कर्जाची परतफेड केलीच पण वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी स्वतःचे घर घेतले. या घराची किंमत अंदाजे 1.8 कोटी रुपये आहे.

Sushma Andhare । आत्ताची सर्वात मोठी बातमी! सुषमा अंधारे यांनी ट्विट केलेल्या त्या व्हिडीओमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Spread the love