Maharashtra Krishi Din । भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशात अनेकजण शेतीवर आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. १ जुलै हा दिवस प्रत्येक वर्षी महाराष्ट्र कृषी दिन (Maharashtra Krishi Din) म्हणून साजरा केला जातो. कृषीसंस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचा प्रतिक म्हणून आजच्या दिवसाला खूप महत्त्व आहे. अनेक ठिकाणी हा आठवडा कृषी सप्ताह (Agriculture Week) म्हणून साजरा करण्यात येतो. (Latest Marathi News)
आपल्यापैकी अनेकांना असा प्रश्न पडला असेल की आजचाच दिवस कृषी दिन म्हणून का साजरा केला जातो. तर यामागचे कारण असे की हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांची आज जयंती असते. त्यांची कृषी क्षेत्रातील योगदानाची आठवण करून देण्यासाठी 1 जुलै दिवस संपूर्ण राज्यात कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
धक्कदायक! दवाखान्यासाठी पैसे नाहीत म्हणून तरुणाने केले भयानक कृत्य
त्यांनी ज्यांच्याकडे जमिनी नव्हत्या त्यांच्यासाठी त्यांनी लाखो एकर जमीन वाटप केली होती. त्याशिवाय त्यांनी चार कृषी विदयापिठाची स्थापनाही त्यांनी केली. १९७२ मध्ये दुष्कळाचे सावट असताना त्यांनी शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करुन दिली. तसेच त्यांनी इतरही मदत मोठ्या प्रमाणात केली होती. त्यामुळे आजचा दिवस राज्यात महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
‘जनतेच्या शापामुळे समृद्धी महामार्गावर अपघात झाला’ संजय राऊत यांचा राज्य सरकारवर धक्कादायक आरोप