अलीकडील काळातील तरुण वेगवेगळ्या पद्धतीने लग्न सोहळा पार पडतात. परंतु सध्या लग्नासाठी सजवलेली कार न घेऊन जाता, तरुणाई पारंपारिक पद्धतीने बैलगाडीतून ( bullock cart ) प्रवेश करतात. सध्या अशाच एका पुरंदर तालुक्यातील लग्न सोहळ्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर ( Pune Purandar ) तालुक्यातील निळुंज गावातील नववधुने बैलगाडी मधून लग्नाच्या कार्यालयामध्ये प्रवेश केला.
चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल; म्हणाल्या, “सुप्रियाताई तुम्ही तर सरड्याप्रमाणे रंग…”
सात ते आठ बैलगाड्या या लग्न सोहळ्यासाठी सजवल्या होत्या. या सजवलेल्या बैलगाड्यांमधून संपूर्ण वऱ्हाड हे लग्नस्थळी पोहोचले होते. हा अनोख्या पद्धतीचा लग्न सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सोशल मीडियावर या अनोख्या लग्न सोहळ्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. नवरा आणि नवरी हे दोघेही शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे त्यांनी बैलगाडीतून लग्न सोहळ्याला जाण्याचा प्रवास करण्याचा निर्णय घेतला.
ब्रेकिंग! बारामती, दौंड परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू
या नवरा नवरी ने बैलगाडीतून केलेली एन्ट्री हा चर्चेचा विषय ठरला आहे. नवरा नवरी ने घेतलेला हा निर्णय लोकांना खूप आवडला. अलीकडील काळामध्ये लुप्त होत असलेल्या संस्कृतीला उजाळा ( Bring a dying culture to life ) मिळाला असल्याची चर्चा लग्न सोहळ्यामध्ये आलेल्या नागरिकांनी केली. आकाश बनकर आणि मेघा चौरे अशा या नवरा नवरीची चर्चा व कौतुक केलं जात आहे.